ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीवरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. “प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळत असते हा अनुभव आहे. अशी डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी झाली पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्यांना डॉक्टरेट कशी देता? एकनाथ शिंदे डॉक्टर झाले असतील तर आनंदच आहे. पण त्यांनी स्वत:वरच शस्त्रक्रिया करायला हवी”, असा टोलाही राऊतांनी लगावला.
#EknathShinde #SanjayRaut #TanajiSawant #BJP #Shivsena #ShambhurajDesai #Corona #ChhaganBhujbal #Maharashtra #Mumbai #Pandharpur #MNS #SamajwadiParty #HWNews